ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…
विविध मान्यवरांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे दिनांक २६ जानेवारी रोजी मुलांची निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला.यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष फटू नारायण धर्णे हे होते.व्यासपीठावर उपसरपंच अशोक धर्णे,…
