मनीष दळवी यांच्या निर्णयाने भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते, हितचिंतक यांना धक्का..
⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील
5 जि. प. गट व 10 पंचायत समिती गण साठी एकूण 80 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.आज मंगळवारी (27 जानेवारी ) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 37
उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यात आडेली जिल्हा परिषद गट मधून भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला. तर आसोली पंचायत समिती गण मधून अन्य 2 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील भाजपा उमेदवार संकेत धुरी हे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे 14 जागासाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. 5 जिल्हा परिषद गट साठी एकूण 29 अर्ज दाखल झाले होते. यातील 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 16 उमेदवार रिंगणात आहेत. तर
10 पंचायत समिती गण साठी 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील 24 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 9 जागासाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत.
रिंगणात असलेले उमेदवार
जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय :
म्हापण जिल्हा परिषद गट :
वंदना किरण किनळेकर (अपक्ष), प्रतीक्षा चंद्रशेखर पाटकर (ठाकरे शिवसेना), यज्ञा देवदत्त साळगावकर ( महायुती).
आडेली जिल्हा परिषद गट :
समिधा समीर नाईक ( अपक्ष), विजय वासुदेव नाईक ( ठाकरे शिवसेना ), सखाराम सचिन सारंग (श. पवार रा. कॉ.पक्ष)
तुळस जिल्हा परिषद गट :
योगिता यशवंत परब ( महायुती), सुजाता अजित पडवळ (अपक्ष), पल्लवी रमाकांत आरमारकर (ठाकरे शिवसेना).
उभादांडा जिल्हा परिषद गट :
मनवेल गिरगोल फर्नांडिस ( महायुती), संजय दत्ताराम गावडे ( ठाकरे शिवसेना ).
रेडी जिल्हा परिषद गट :
प्रितेश शंकर राऊळ ( महायुती), नामदेव शिवाजी राणे ( ठाकरे शिवसेना), काशिनाथ नीलकंठ नार्वेकर (अपक्ष), किरण जनार्दन पालयेकर (अपक्ष), चंद्रहास उमेश पांडजी (अपक्ष).
म्हापण पंचायत समिती गण : अशोक रमाकांत पाटकर ( ठाकरे शिवसेना), विष्णू विठ्ठल फणसेकर (महायुती), निकित अशोक राऊळ ( अपक्ष ).
परुळे पंचायत समिती गण : सचिन दामोदर देसाई ( शिवसेना), वासुदेव विष्णू माधव (ठाकरे शिवसेना), निलेश सामंत ( भाजपा), संकेत मधुकर केळूसकर ( अपक्ष).
आडेली पंचायत समिती गण :
नितीन रामचंद्र मांजरेकर ( अपक्ष), नित्यानंद बाळकृष्ण शेणई ( ठाकरे शिवसेना ), जनार्दन रुकमांगद कुडाळकर ( अपक्ष).
वायंगणी पंचायत समिती गण :
शीतल बाबू राऊत ( महायुती), ्रुतिका रुपेश माडकर ( ठाकरे शिवसेना ).
तुळस पंचायत समिती गट :सुचिता दत्तात्रय वजराटकर ( महायुती ), नयना जनार्दन धुरी ( अपक्ष), अमृता अनिल साळगावकर (अपक्ष).
मातोंड पंचायत समिती गण :
शंकर शशिकांत घारे ( महायुती), रमाकांत बाबाजी कोंडये ( ठाकरे शिवसेना), विशाल शंकर बागायतकर ( श. पवार रा. कॉ.), विजय महादेव रेडकर ( अपक्ष).
उभादांडा पंचायत समिती गण :
साक्षी शैलेश नार्वेकर ( महायुती), गंधाली रुपेश तांडेल (ठाकरे शिवसेना).
आसोली पंचायत समिती गण : बिनविरोध.
रेडी पंचायत समिती गण :
प्रियांका शंकर घाटवळ ( महायुती), वंदना विनोद कांबळी (ठाकरे शिवसेना).
शिरोडा पंचायत समिती गण :
योगिता सिद्धेश परब – मसुरकर (अपक्ष), शीतल राजेश साळगावकर ( महायुती), समृद्धी संतोष कुडव ( ठाकरे शिवसेना).
आज सकाळी 11 वा. पासून 3 वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या उपस्थितीत ही अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. सायंकाळी
उशिरा निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी येथे भेट देऊन माहिती घेतली.
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवाराची गर्दी होती.
