⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुक्यातील तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार 29 जानेवारीपासून सुरू होत आहे पाच दिवस चालणा-या या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर समिती व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे
गुरुवार 29 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता अभिषेक सोहळा सकाळी नऊ वाजता महापूजा हळदीकुंकू आरती व तीर्थप्रसाद संध्याकाळी पाच वाजता ह भ प महेश बुवा धामापूरकर मालवण यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.सायंकाळी सात वाजता ग्रामस्थांची भजने ,रात्रौ दहा वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा ,अकरा वाजता दोन अंकी हृदयस्पर्शी मालवणी नाटक वाट चुकलो देवा लेखक किशोर तळवळकर दिग्दर्शक नंदकुमार तळवडकर ,आयोजक श्री गोपाळ कृष्ण सवंगडी मंडळ तळाशील.
शुक्रवार 30जानेवारी रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद रात्रौ दहा वाजता शालेय मुलांचा गुणगौरव सोहळा रात्रौ साडेदहा वाजता सामाजिक नाटक छुमंतर सादर करते श्री गोपाळकृष्ण कला विभाग मुंबई .
शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद तीन वाजता फनी गेम्स स्पर्धा आयोजक गुड बॉईज ग्रुप तळाशील, रात्रौ दहा वाजता फुल टू धमाल दोन अंकी विनोदी नाटक दिसतं तसं नसतं, सादरकर्ते आकांक्षा मित्र मंडळ तळाशील
रविवार 1 फेब्रुवारी रोजी अक्षय सातार्डेकर प्रस्तुत आर्केस्ट्रा स्वर अक्षय आयोजक गुड बॉईज ग्रुप तळाशील. सोमवार 2 फेब्रुवारी रोजी रात्रौ दहा वाजता दोन अंकी तुफान विनोदी नाटक काका किशाचा सादर कर्ते श्री देव गोपाळ कृष्ण कला मंच तळाशील आहेत. तरी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ आणि श्री गोपाळ कृष्ण मंदिर समिती यांच्याकडून करण्यात आले आहे
