इन्सुली क्षेत्रफळवाडीत पट्टेरी वाघाचे दर्शन…
बांदामुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ, सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळवाडी नजीकच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा भव्य पट्टेरी वाघ दिसल्याने, या भागातील त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेली अनेक वर्षे या संवेदनशील नैसर्गिक पट्ट्याला ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ घोषित करण्यासाठी लढणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या संघर्षाला मिळालेले एक मोठे बळ…
