चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला आजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती उमेद अभियानांतर्गत एकता प्रभागसंघ मळेवाड ,PRI – CBO Convergence Project अंतर्गत शिवप्रेमी बालसभा स्थापन झाली या अंतर्गत मैत्री ग्रामसंघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विलासानंद मठकर , मदन मुरकर, सुनील गोवेकर, बी आर पी प्राची राऊळ,मळेवाड समन्वयक अनुप देऊलकर, प्रभाग व्यवस्थापक प्रचिती मडूरकर,सचिव अवंती नाईक,मैत्री ग्रामसंघ अध्यक्ष प्रिया आजगावकर,ग्रामसखी एल आर पी उमा आजगावकर, छाया हरमलकर, सरोज रेडकर,शिवप्रेमी बालसभा अध्यक्ष कनक काळोजी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रिया आजगावकर यांनी केली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रामसंघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमातील प्रमुख अतिथी विलासानंद मठकर यांनी बोलताना सांगितले की,खरोखरच ग्रामसंघाचे कार्य प्रशंसनीय असे आहे.त्यांनी विद्यार्थ्यांचे अंगभूत कौशल्य ओळखून चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून या मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे तसेच असे नवनवीन उपक्रम गावागावात राबविण्याचे आवाहन करत उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबत शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.छोट्या छोट्या मुलांनी आपल्या हाताच्या बोटाच्या कुंचल्यातून आकर्षक अशी एकापेक्षा एक चित्रे रेखाटून त्यात रंग भरले.तर दुसरीकडे वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यात विविध विषयांवर मुलांनी वक्तृत्व सादर केले व सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

चित्रकला स्पर्धेतील विजेते :-प्रथम :- प्रिशा विष्णु गोवेकर, वेदा मंदार शेटकर ,द्वितीय :- कैवल्य प्रमोद पांढरे ,गौरव संतोष पांढरे,तृतीय :- तेजल अजित पांढरे , स्वरा गुंडू हळदणकर तर उत्तेजनार्थ :- संचित संदीप पांढरे, महंत विकास पांढरे .

वक्तृत्व स्पर्धा:- प्रथम – आराध्या संदेश नाईक, द्वितीय – दुर्वा उमेश शेटकर, तृतीय – वसंत संदेश नाईक ,तर उत्तेजनार्थ सई रवींद्र गवंडे.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
सदरील चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मदन मुरकर तर वक्तृत्व स्पर्धेसाठी सुनील गोवेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेला ग्रामपंचायत आजगाव ,प्राथमिक शाळा आजगाव यांनी सहकार्य केले तर स्पर्धेसाठी बक्षिसे ही मार्मिक सेवामंडळ ,मुंबई यांनी पुरस्कृत केली होती तसेच आजगाव उपसरपंच सुशिल कामटेकर यांनी उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहारची सोय केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया आजगावकर तर आभार उमा आजगावकर यांनी मानले.
यावेळी बालसभा सदस्य,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page