आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता :शेतकरी बागायतदार चिंतेत..
⚡सावंतवाडी ता.२३-: आज सकाळी मळेवाड पंचक्रोशित अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेले दोन तीन दिवस वातावरणातील तापमान वाढले होते.त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते.मात्र ऐन काजू ,आंब्याच्या हंगामात या अवकाळी पावसाच्या आगमनाने येथील शेतकरी ,बागायतदार मात्र धास्तावला आहे.
आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच सर्वत्र धुकं पसरलं होतं.त्यामुळे पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरू असल्याचे दिसत होते.पावसामुळे रस्त्यावर पाणी पडून रस्ता निसरडा बनला होता.मात्र काही वेळाने वातावरणात बदल होत काही ठिकाणी दमट वातावरण तर काही ठिकाणी उष्ण वातावरण पसरले होते.मात्र या अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच धांदल उडाली.
