कारिवडे येथे चालत्या दुचाकीला लागली आग…

दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना; शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती..

⚡सावंतवाडी ता.२३-: कारिवडे येथे चालत्या दुचाकीने अचानक शॉर्टसर्किटमुळे पेट घेत पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारिवडे गावातील वायरमन ऋषिकेश परब हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ दुचाकी बाजूला घेत सुरक्षित अंतर राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र काही मिनिटांतच दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.

You cannot copy content of this page