बाजारपेठेतील मंडळाच्या कार्याचे कौतुक…!
⚡कणकवली ता.२३-: शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला सायंकाळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री देव गणपती, साईनाथ महाराज तसेच श्री देव महापुरुष यांचे दर्शन घेतले.
महापुरुष महाउत्सवाच्या निमित्ताने शहरात उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्यांची पाहणी करत सावंत यांनी मंडळाच्या उपक्रमशीलतेचे आणि नियोजनबद्ध आयोजनाचे विशेष कौतुक केले. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य महापुरुष मित्रमंडळ सातत्याने करत असल्याचे सांगत त्यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन संदेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक राजू मानकर, अमित सापळे, साकेडी गावचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, चेतन अंधारी, निखिल घेवारी, प्रद्युम मुंज, आदी उपस्थित होते. तसेच पत्रकार चंद्रशेखर देसाई व वीरेंद्र चिंदरकर यांचा हि सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
महापुरुष मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाउत्सवाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. धार्मिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि देखण्या सजावटीमुळे परिसरात उत्सवाचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.
