Headlines

नांदगाव येथील मोरजकर ट्रस्ट च्या वतीने आरोग्य केंद्राच्या दुतर्फा रस्त्याची स्वच्छता….

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केली स्वच्छता    *💫कणकवली दि.०९-:*        कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. स्वच्द भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा पंधरावडा असल्याने तसेच ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर…

Read Full News

नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करा

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी;दोन दिवसात निर्णय घेण्याचे नगराध्यक्ष संजू परब यांचे आश्वासन *💫सावंतवाडी दि.०९-:* आज झालेल्या नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी शहरातील नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली असून, यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यायाम शाळा सुरू झाल्या असून,…

Read Full News

कोरोना लसीचे परिक्षण करण्यासाठी भारतातील १२ हॉस्पिटल्सची निवड

*मालवण येथील रेडकर हॉस्पिटला हे संशोधन करण्यास मान्यता *💫मालवण दि.०९-:* कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी होत असलेल्या संशोधनाचा महत्वाचा भाग म्हणून तयार होणारया लसीचे परिक्षण करण्यासाठी भारत सरकारतर्फे संपूर्ण भारतातील १२ हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली होती. धारगळ,गोवा येथील रेडकर हॉस्पिटलची या परिक्षणासाठी निवड झाली होती. सदर परिक्षणाच्या पहिल्या दोन फेरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता अंतिम…

Read Full News

नगरपालिका प्रशासनाकडून गाळेधारकांकडून भाडे घेण्यास नकार

सेनेच्या जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.०९-:* कॉम्प्लेक्स मधील गाळे धारक भाडे देण्यास नगरपालिकेत आले असता, नगरपालिका प्रशासन भाडे घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी गाळेधारकांनकडून भाडे वसूल करावे परंतु या कठीण काळात प्रीमियम घेऊ नये असे मत त्यानी मांडले आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक…

Read Full News

विरोधी नगरसेवकांकडून सत्ताधारी नगरसेवकांना बदनाम करण्याचा डाव

चौकशी केल्यास कोण पैसे घेतो हे समजेल;लवकरच होईल दूध का दूध ओर पानी का पाणी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.०९-:* सत्ताधारी नगरसेवकाना विरोधी नगरसेवक बाजारपेठेत बदनाम करत असून, मार्केट मधून पैसे घेत असल्याचा आरोप करत असून, मार्केट मध्ये योग्य चौकशी केल्यास कोण पैसे घेत याचे दूध का दूध ओर पाणी का पाणी होऊन…

Read Full News

अज्ञाताने लावलेल्या आगीत २ दुचाकी जळून खाक तर १ अंशतः जळाली

*💫कणकवली दि.०९-:* येथे रवळनाथ मंदिराजवळ अज्ञाताने दुचाकींना आग लावली असून, यात २ दुचाकी गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर तिसरी डिस्कवर मोटारसायकल अंशतः जळाली आहे. या अग्नी तांडवाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजय ढेकणे यांच्या घराच्या शेजारी या गाड्या उभ्या होत्या. मध्यरात्री दीड नंतर ही आग लावण्यात आली आहे. या आगीत मोहिते यांची…

Read Full News

वेंगुर्ला रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार साजरा *💫वेंगुर्ला दि.०८-:* वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होत आहे. यानिमित्त रात्री ११ वाजता पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. मंदिरात येताना भाविकांनी व जत्रा कालावधीमध्ये मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांच्या दुकानदारांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार…

Read Full News

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभागतर्फे भरतगड, भगवंत गड अभ्यास मोहिम

विविध शिवकालीन वस्तूंची प्रतिष्ठानच्यावतीने पाहणी *💫सावंतवाडी दि.०८-:* सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभाग टिमने मसुरे गावात भरतगडाच्या पायथ्याशी माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर यांच्या घरी खोदकाम करताना सापडलेली तोफ पाहण्यासाठी आणि भरतगड आणि भगवंत गड अभ्यास मोहिम राबविली. यादरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने संग्राम प्रभुगावकर यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या घरी असलेल्या तलवारी, मशाली, नंदादीप, होन,…

Read Full News

भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

*💫वेंगुर्ला दि०८-:* वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील मंदिर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ विठ्ठल रखुमाईला श्रीफळ देऊन करण्यात आला. भुजनागवाडी येथे पुरातन असे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिरात एकादशी, भजनी सप्ताह, राम नवमी, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. सदरील मंदिराची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम गेल्यावर्षीपासून हाती घेतले…

Read Full News

संजय गांधी निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजूरी

*💫वेंगुर्ला दि.०८-:* वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या त्रैमासिक बैठकीत एकूण ९७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहेत. ही बैठक वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विश्वनाथ परब, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविंद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश भोसले, गटविकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, तहसिलदार…

Read Full News

You cannot copy content of this page