*💫वेंगुर्ला दि.०८-:* वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या त्रैमासिक बैठकीत एकूण ९७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहेत. ही बैठक वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विश्वनाथ परब, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविंद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश भोसले, गटविकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, तहसिलदार प्रविण लोकरे व निलेश मयेकर उपस्थित होते. या बैठकीत संजय गांधी अनुदान योजनेची ६१, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची २५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची ११ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजूरी
