*💫वेंगुर्ला दि०८-:* पाल येथील श्री खाजणादेवी व श्री भूमिकादेवी जत्रोत्सव अनुक्रमे १९ व २० डिसेंबर रोजी साजरा होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे जत्रोत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अत्यंत साध्या पद्धतीने व गाव मर्यादित करण्याचे ठरविण्यात आले आहे. भाविकांनी मंदिरात येताना तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्स आदी नियमांचे पालन करावयाचे आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने घेऊन येऊ नयेत, असे आवाहन समस्त गावकर मंडळी, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व पाल ग्रामोन्नत्ती मंडळ मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
पाल-खाजणादेवी व भूमिकादेवी जत्रोत्सव १९ व २० डिसेंबर
