अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.०८-:* न्हावेली शाळा नंबर १ च्या पोषण आहार खोलीत अज्ञाताने प्रवेश करून त्या खोलीतील गॅस सिलिंडर आणि मिक्सर असा २२०० रुपयाचा मुद्देमाल चोरी करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत न्हावेली मुख्याध्यापिका नाईक यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात धाव घेतली असून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्या चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे शाळा बंद असताना शाळेच्या पोषण आहार खोलीत प्रवेश करत त्यानी या वस्तू चोरी केल्या आहेत. ही बाब मुख्याध्यापिका नाईक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.