*💫कुडाळ दि.०८-:* वेताळ-बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 09 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले होणार असून वार्षिक भेटीचे नारळ अर्पण करणे,नवस फेडणे,ओट्या भरणे आदी कार्यक्रमांस सुरुवात होणार आहे. यासाठी भाविकांनी कोरोना विषाणू आपत्काल पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याने फेसमास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमावलिंचे काटेकोरपणे पालन करावे. रात्री 9 वाजता वाजत गाजत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून 11.30 वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे दशावतार नाटक होणार आहे. तरीही सर्व भाविकांनी जबाबदारीपूर्वक सर्व नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व श्री देव वेतोबा उत्सव मंडळ आणि सर्व बारा पाच मानकरी, वेताळ बाँबर्डे यांनी केले आहे.
बांबर्डे येथील ग्रामदैवत वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार साजरा
