वेंगुर्ला रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार साजरा

*💫वेंगुर्ला दि.०८-:* वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होत आहे. यानिमित्त रात्री ११ वाजता पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. मंदिरात येताना भाविकांनी व जत्रा कालावधीमध्ये मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांच्या दुकानदारांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टंसींग आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page