*💫कणकवली दि.०९-:* येथे रवळनाथ मंदिराजवळ अज्ञाताने दुचाकींना आग लावली असून, यात २ दुचाकी गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर तिसरी डिस्कवर मोटारसायकल अंशतः जळाली आहे. या अग्नी तांडवाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजय ढेकणे यांच्या घराच्या शेजारी या गाड्या उभ्या होत्या. मध्यरात्री दीड नंतर ही आग लावण्यात आली आहे. या आगीत मोहिते यांची प्लेजर, पाताडे यांची यामाहा तर कळसुली हायस्कूलचे शिक्षक अमर पवार यांची डिस्कवर गाडीचा काही भाग जळून गेला आहे. या गाड्यांना आग लागल्यानंतर संजय ढेकणे यांना जाग आल्या नंतर त्यांनी पाण्याने हि आग विझवली परंतु त्या आधीच दोन गाड्या जळून गेल्या होत्या.
अज्ञाताने लावलेल्या आगीत २ दुचाकी जळून खाक तर १ अंशतः जळाली
