सेनेच्या जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप
*💫सावंतवाडी दि.०९-:* कॉम्प्लेक्स मधील गाळे धारक भाडे देण्यास नगरपालिकेत आले असता, नगरपालिका प्रशासन भाडे घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी गाळेधारकांनकडून भाडे वसूल करावे परंतु या कठीण काळात प्रीमियम घेऊ नये असे मत त्यानी मांडले आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी ही गाळे धारकांकडून गाळ्यांचे भाडे वसूल करण्यास नगरपालिका प्रशासनास समंती दिली आहे. तसेच कॉम्प्लेक्समधील ९ गाळे धारकाकडून अडीच लाख रुपये नगराध्यक्षांच्या नावे काहींनी घेतले असल्याचा आरोप पण त्यांनी यावेळी केला आहे.