Headlines

दोडामार्ग मध्ये मतदान शांततेत व सुरळीत पार

एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान *💫दोडामार्ग दि.१५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. यात तेरवण-मेढे ६६.४२ टक्के, आयनोडे-हेवाळे येथे ८०.३९ टक्के व कुडासे येथे ६४.८० टक्के असे एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. हे मतदान सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडले. कुडासेत शिवसेना व भाजप पुरस्कृत पॅनल तर तेरवण -मेढे मध्ये शिवसेना…

Read Full News

“त्या” मद्यधुंद युवकाला युवतीच्या वडिलांनी दिला चोप

मालवण दि. प्रतिनिधी सायकल वरून शाळेतून घरी परतत असताना शाळकरी मुलीला धडक देऊन युवतीला धमकाविणाऱ्या मालवण शहरातील युवकाला त्या युवतीच्या वडिलांनी चोप दिला. या घटनेची मालवणात चर्चा सुरू होती.       आज दुपारी शाळा सुटल्यानंतर शाळकरी मुलगी आपल्या मैत्रिणींसह भरड नाक्यावरून घरी जात असताना मालवण नाट्यगृह समोरील युवक मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकलने नो एन्ट्री मधून भरधाव…

Read Full News

*देवगड तालुक्यात ६८.७० टक्के मतदान*

देवगडः- देवगड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या १४८ जागांसाठी ३०८ उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत जमा झाले असून तालुक्यामध्ये एकुण ६८.७० टक्के मतदान झाले .यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान कुणकेश्वर ग्रामपंचायतीमध्ये ७८.२० एवढे झाले आहे.यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाणात मतदान पाळेकरवाडी ग्रामपंचायतीमधून ५४.९६ एवढे झाले आहे. देवगड तालुक्यामधील २१ ग्रामपंचायतीचे निवडणुकिचे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडले आहे.कातवण ग्रामपंचायतीमधून ७७.५२टक्के,टेंबवली ग्रामपंचायतीमधून…

Read Full News

*इन्सुली येथील भीषण अपघातात बेंगलूर येथील पर्यटक जागीच ठार*

*बांदा दि.१५-:* मालवणहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हलरला इन्सुलीत भीषण अपघात झाला असून, या अपघातात गाडीच्या बाहेर फेकला गेल्याने गाडीखाली चिरडून बेंगलूर येथील एक पर्यटक बी. के. योगेश (वय ३२) जागीच ठार झाला आहे. गाडीतील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हे पर्यटक केरळसह अन्य राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी आले…

Read Full News

वैभववाडी तालुक्यात १२ ग्रामपंचायतीसाठी टक्के ६९.३८ टक्के मतदान.

७० जागांसाठी १४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात बंद. *💫वैभववाडी दि.१५.-:* तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडली.तालुक्यात सरासरी ६९ टक्के मतदान झाले आहे. १२ ग्रामपंचायतीतील ७० जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.यांचे भवितव्य मतदान यंञात बंद झाले आहे.कोणतीही अनुचित घटना घडली नाही.खांबाळे येथे मतदान यंञ बंद पडल्यामुळे काहीवेळ मतदान प्रक्रीया बंद पडली…

Read Full News

मतदानाची धामधूम सुरू असताना त्यांनी दाखविली समयसूचकता !

उमेदवार लाड यांनी अपघातातील जखमीला दाखल केले रुग्णालयात.* मालवण दि गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायत निवडणूकीची मतदान प्रकिया आज सुरू असतानाच दुपारच्या सत्रात गोळवण येथील मतदान केंद्रावर मतदान करून तिरवडे येथे कामावर परतत असताना अनिल बाळकृष्ण जाधव या ३५ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली हा अपघात घडल्याचे समजताच गोळवणचे माजी सरपंच…

Read Full News

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत १९ रोजी वीज बिल पताका आंदोलन…

*💫मालवण दि.१५-:* कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन होम स्टे व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे या कालावधीतील पर्यटन व्यावसायिकांना वीज बिल माफी मिळावी तसेच टाळेबंदीनंतरच्या कालावधी नंतर पुढील सहा महिने वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत वीज वितरण कंपनी…

Read Full News

शाळेची घंटा २७ जानेवारीला वाजणार

५ वी ते८ वीच्या शाळा होणार सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती* *💫मुंबई दि.१५-:* राज्यातील ५ वी ते ८ च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी कोरोना बाबत सर्व प्रकारची काळजी घेऊनच शाळा सुरू होतील असे ही त्या म्हणाल्या आहेत.

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत वेधले आरोग्य सेवा उपसंचालकांचे लक्ष…

*💫मालवण दि.१५-:* मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीवर आलेले आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांची माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व नागरिकांनी भेट घेत ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत लक्ष वेधले. रुग्णालयातील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची पदे भरली जावीत, कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळावा, स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे यासह ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे अशा विविध मागण्या…

Read Full News

मालवण मध्ये ६ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ६८ टक्के मतदान

*💫मालवण दि.१५-:* तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी एकूण ६८ टक्के मतदान झाले. यामध्ये खरारे-पेंडूर ६४.२५, गोळवण-कुमामे-डीकवल ७१.०४, कुणकावळे ६८.१०, मसदे-चुनवरे ७२.०२, चिंदर ६७.१४, आडवली-माडली ७१.७३ असे मतदान झाले आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read Full News

You cannot copy content of this page