*इन्सुली येथील भीषण अपघातात बेंगलूर येथील पर्यटक जागीच ठार*

*बांदा दि.१५-:* मालवणहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हलरला इन्सुलीत भीषण अपघात झाला असून, या अपघातात गाडीच्या बाहेर फेकला गेल्याने गाडीखाली चिरडून बेंगलूर येथील एक पर्यटक बी. के. योगेश (वय ३२) जागीच ठार झाला आहे. गाडीतील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हे पर्यटक केरळसह अन्य राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी आले असताना, गोव्यातून ते मालवणला पर्यटनासाठी आले होते. पर्यटन आटपून सायंकाळी माघारी परतत असताना गाडीचा टायर फुटल्याने इन्सुली डोबवाडी येथे सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

You cannot copy content of this page