देवगडः- देवगड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या १४८ जागांसाठी ३०८ उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत जमा झाले असून तालुक्यामध्ये एकुण ६८.७० टक्के मतदान झाले .यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान कुणकेश्वर ग्रामपंचायतीमध्ये ७८.२० एवढे झाले आहे.यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाणात मतदान पाळेकरवाडी ग्रामपंचायतीमधून ५४.९६ एवढे झाले आहे. देवगड तालुक्यामधील २१ ग्रामपंचायतीचे निवडणुकिचे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडले आहे.कातवण ग्रामपंचायतीमधून ७७.५२टक्के,टेंबवली ग्रामपंचायतीमधून ६२.६८,पाटथर ग्रामपंचायतीमधून ६८.८,धालवली ग्रामपंचायतीमधून ६३.४९,कोर्ले ग्रामपंचायतीमधून ७३.३२,पाळेकरवाडी ग्रामपंचायतीमधून ५४.९६,गढिताम्हाणे ग्रामपंचायतीमधून ७४.२८,मोंड ग्रामपंचायतीमधून ५९.६२, तांबळडेग ग्रामपंचायतीमधून ५७.४१, qलगडाळ ग्रामपंचायतीमधून ७६.२५, मुणगे ग्रामपंचायतीमधून ६५.८२,मिठबांव ग्रामपंचायतीमधून ६५.५९, इळये ग्रामपंचायतीमधून ७२.५५, कुणकेश्वर ग्रामपंचायतीमधून ७८.२०,वाडा ग्रामपंचायतीमधून ६३.६७, मुटाट ग्रामपंचायतीमधून ७२.२४, नाडण ग्रामपंचायतीमधून ७५.४४, वरेरी ग्रामपंचायतीमधून ७३.६३, तळवडे ग्रामपंचायतीमधून ६६.७५, पुरळ ग्रामपंचायतीमधून ७२.६२, शिरगांव ग्रामपंचायतीमधून ६६.०६ एवढे मतदान झाले आहे. तर इळये ग्रामपंचायतीच्या हददीमधील ९ कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना तेथील ग्रामपंचायत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना सायंकाळी ४.३० नंतर मतदान केंद्रामध्ये सुरक्षिततेची काळजी घेउन सॅनिटायझरचा वापर करुन या 8 ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.तालुक्यामध्ये एकुण ८८५० स्त्री तर पुरुष ९३५१ अशा एकुण १८२०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यापुर्वी मोंडपार व रहाटेश्वर या दोन ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. तर मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार असून सर्वांचे लक्ष मतमोजणी निकालाकडे वेधून राहिले आहे.
*देवगड तालुक्यात ६८.७० टक्के मतदान*
