मालवण दि. प्रतिनिधी सायकल वरून शाळेतून घरी परतत असताना शाळकरी मुलीला धडक देऊन युवतीला धमकाविणाऱ्या मालवण शहरातील युवकाला त्या युवतीच्या वडिलांनी चोप दिला. या घटनेची मालवणात चर्चा सुरू होती. आज दुपारी शाळा सुटल्यानंतर शाळकरी मुलगी आपल्या मैत्रिणींसह भरड नाक्यावरून घरी जात असताना मालवण नाट्यगृह समोरील युवक मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकलने नो एन्ट्री मधून भरधाव वेगाने जात असताना त्या युवतीच्या सायकलला धडक दिली. त्यावेळी संबंधित युवती सायकलवरून खाली कोसळली. तिला दुखापत झाल्याने तिने धडक देणाऱ्या युवकाला जाब विचारला. याचा राग आल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या त्या युवकाने युवतीला धमकावले. हा प्रकार युवतीने आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी त्या युवकाला यथेच्छ चोप दिला. आज या प्रकाराची चर्चा मालवणात सुरू होती
“त्या” मद्यधुंद युवकाला युवतीच्या वडिलांनी दिला चोप
