तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत १९ रोजी वीज बिल पताका आंदोलन…

*💫मालवण दि.१५-:* कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन होम स्टे व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे या कालावधीतील पर्यटन व्यावसायिकांना वीज बिल माफी मिळावी तसेच टाळेबंदीनंतरच्या कालावधी नंतर पुढील सहा महिने वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत वीज वितरण कंपनी मालवण कार्यालयात वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच ज्या पर्यटन व्यावसायिकांनी मागील लाईट बिल रक्कम जमा केली आहेत, त्यांची रक्कम पुढील बिलात जमा करावी हि मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक अडचणीत असून २०१९ दिवाळी मध्ये क्यार वादळ, डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिति व २०२० मध्ये कोरोना मुळे पर्यटन जिल्ह्यात पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे, हॉटेल लॉजिग, बोटींग,वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट व्हेईकल यांची आर्थिक स्थिति दयनीय झाली आहे. या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे ? हा यक्ष प्रश्न या व्यावसायिकांना भेडसावत आहेत. स्थानीक व्यावसायिकांनी सरकारी मदत कींवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करून जिल्ह्याचे पर्यटन शेत्रात नाव जगाच्या नकाशा वर कोरले आहे. या सर्व विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यावसायिक आपल्या हॉटेलच्या बाहेर लाल झेंडा, लाल शाई मध्ये समस्या लिहुन पोस्टकार्ड आंदोलन करून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व सरकारचे लक्ष वेधले आहे. या लाईट बिल पताका आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा निषेध करण्याचा नसून पर्यटन, होमस्टे व्यावसाईक आर्थिक संकटात असून सरकारने या व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोबत यावे हा आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील पर्यटन व होमस्टे, हॉटेल व्यावसायिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्था अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page