Headlines

दांडेली गावासाठी डॉक्टर उपलब्ध करून द्या….

सरपंच दादा पालयेकर यांची मागणी : ज्येष्ठ रुग्णांची होते गैरसोय_ *💫बांदा दि.०८-:* दांडेली गावात आरोग्यवर्धिनी केंद्र नाही. बुधवारी आठवडा बाजारादिवशी दांडेलीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदी विक्रीसाठी येतात. त्यामुळे ज्येष्ठ व इतर रुग्णांना तपासणीसाठी निदान बुधवारी एक डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, दांडेली सरपंच कृष्णा उर्फ दादा पालयेकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय…

Read Full News

टेम्पोचे चाक पायावरून गेल्याने सर्व्हिस सेंटर मालक गंभीर जख्मी

मालवण दि मालवण वायरी रांगोळी महाराज मठ नजीकच्या सर्व्हिसिंग सेंटर येथे एम. एच .०७. एजे. १४५९ हा आयशर टेम्पो मागे घेत असताना सेंटरचे मालक श्रीधर उर्फ आप्पा मराळ यांच्या पायावरून टेम्पोचे चाक गेल्याची घटना आज सकाळी ८:३० वाजता घडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Read Full News

वाहतूकदारांच्या समस्या सुटल्या नाहीत तर देशव्यापी चक्काजाम आंदोलन

महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचा राज्य व केंद्र सरकारला इशारा* *💫कुडाळ दि.०७-:* देशपातळीवरील वाहतूकदारांच्या विविध समस्या निर्माण झाले असून या समस्या सुटण्यासाठी केंद्र शासनाला नोटीस देण्यात आली आहे येत्या काही दिवसात समस्या सुटल्या नाही तर वाहतूक संघटनेच्यावतीने देशव्यापी चक्काजाम आंदोलन करून सर्व वाहतूकदार आपल्या गाड्या सरकारच्या दारात उभ्या करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर,…

Read Full News

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्यापासून कोविड-१९ लसीकरण…

*💫बांदा दि.०७-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज पासून म्हणजे सोमवार 8 मार्चपासून गावनिहाय ६० वर्षावरील व्यक्तींना कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ सोमवार सकाळी १० वाजता सुरु करण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. हे लसीकरण ६० वर्षांवरील असलेल्या जेष्ठ व्यक्तींना प्रथम केले…

Read Full News

सोनाळीतील विवाहीता बेपत्ता…

पतीची पोलिसात तक्रार *💫वैभववाडी दि.०७-:* सोनाळी बौध्दवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पती गिरीश संजय भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपले लग्न अंकिता भोसले हीच्या बरोबर सन 2015 मध्ये झाले. गेली काही वर्षे अंकिता घर कामानिमित्त मुंबईला होती. ती ऑक्टोबर महिन्यात गावी आली होती. परत ती घर…

Read Full News

बांदा नट वाचनालय आयाेजीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद….

*💫बांदा दि.०७-:* बांदा नट वाचनालय आयाेजीत अंकुश रामचंद्र माजगावकर व परीवार पुरस्कृत कै. परशुराम लाडु नाईक व कै.लश्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उदघाटन अंकुश माजगावकर यांच्या हस्ते कै परशुराम व कै. लश्मी नाईक यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले….

Read Full News

बांदा नट वाचनालयात 13 रोजी पाककला स्पर्धा …..

*💫बांदा दि.०७-:* बांदा नट वाचनालय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा यांच्या सयुक्त विद्यमानाने जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन खास महीला वर्गासाठी पाक कला स्पर्धा शनीवार दि. १३ मार्च राेजी सांयकाऴी ४ वा. बांदा नट वाचनालयात आयाेजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पालेभाज्या व इतर भाज्या पासुन तिखट काेणताही खाद्य पदार्थ असणे आवश्यक आहे….

Read Full News

डेगवे येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक व मुलांसाठी २१ मार्च रोजी सत्संग कार्यक्रम

सावंतवाडी : कश्यप ऋषी आश्रम बांदा, डेगवे येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक व मुलांसाठी २१ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संग कार्यक्रमात पालक व मुलांनी सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.

Read Full News

मालोंड- मालडी बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी लागणारा अधिकचा निधी आणू….

पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही *💫मालवण दि.०७-:* मालोंड- मालडी बंधाऱ्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. या बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्यात यावे. याचबरोबर या बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जी स्थानिकांची मागणी आहे, त्यादृष्टीने लागणारा अधिकचा निधी आणण्याची आपली जबाबदारी असून ती निश्चितच पार पाडली जाईल अशी ग्वाही…

Read Full News

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार-:आमदार दीपक केसरकर…

*💫सावंतवाडी दि.०७-:* मी मंत्रीपदासाठी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीचा फायदा व दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे. त्यामुळे जो मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने ठामपणे उभे राहायला हवे, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read Full News

You cannot copy content of this page