महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचा राज्य व केंद्र सरकारला इशारा*
*💫कुडाळ दि.०७-:* देशपातळीवरील वाहतूकदारांच्या विविध समस्या निर्माण झाले असून या समस्या सुटण्यासाठी केंद्र शासनाला नोटीस देण्यात आली आहे येत्या काही दिवसात समस्या सुटल्या नाही तर वाहतूक संघटनेच्यावतीने देशव्यापी चक्काजाम आंदोलन करून सर्व वाहतूकदार आपल्या गाड्या सरकारच्या दारात उभ्या करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाने राज्य व केंद्र शासनाला दिला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरण अटवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तेथील हॉटेल लेमनग्रासमध्ये (रविवारी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोवा राज्य वाहतूकदार संघटनेची बैठक झाली. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरण अटवाल, ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष व टोल कमिटीचे अध्यक्ष बलमलिकीत सिंग, ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसचे एस. पी. विद, महासंघाचे माजी अध्यक्ष व रोड कमिटी अध्यक्ष प्रकाशराव गवळी- सावकार, चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष ललित गांधी ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्टचे संचालक प्रकाश केसरकर, बाबा शेख, दत्ता काकडे, राजीव दाईंगडे, कायम निमंत्रित मनोज वालावलकर, महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी घोगळे आदी उपस्थित होते या बैठकीत डिझेल पेट्रोलचे वाढलेले दर वाढलेला टॅक्स, टोल यंत्रणेकडून होणारा त्रास, चेक पोस्ट मध्ये होणारा त्रास याबाबत चर्चा करण्यात आली गेल्या १३ फेब्रुवारी रोजी शासनाला नोटीस बजावण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले शासनाबरोबर चर्चा सुरू असून तोपर्यंत जिल्ह्या- जिल्ह्यात जाऊन वाहतूकदार जनजागृती करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने योग्य तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलले नाही तर यापुढे देशव्यापी चक्काजाम बरोबर सरकारकडे वाहने जमा करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला वाहनाचे हप्ते भरणे वाहनधारकांना जमत नाही मात्र फायनान्स कंपन्या त्रास देत आहे लॉकडाऊनमुळे गाड्या बंद होते त्याचा विचार केला जात नाही व्याज घेऊ नका असा निर्णय झाला असताना फायनान्स कंपन्या ऐकत नाही फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला ही आम्ही जशास तसे उत्तर देऊ प्रसंगी फायनान्स कंपनीचे गेटतोडण्याचा इशारा या वाहनधारकानी दिला गुजरात सरकारने सर्व चेक पोस्ट बंद केले त्या धर्तीवर देशभरातील सर्व चेक पोस्ट बंद व्हावे अशी आपली मागणी आहे महामार्ग चौपदरीकरण विस्तारीकरण करताना सर्विस रोडला प्राधान्य द्यावे बाजूला पार्किंग, टॉयलेट, पिण्याची पाण्याची व्यवस्था असावी ठेकेदाराच्या करारात नमूद असताना ठेकेदार करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला योग्य पार्किंग झाले तरी अपघात टळतील असे त्यांनी सांगितले दरम्यान शासनाने याबाबत लवकर तोडगा काढला नाही तर लवकरच चक्काजाम करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
