मालवण दि मालवण वायरी रांगोळी महाराज मठ नजीकच्या सर्व्हिसिंग सेंटर येथे एम. एच .०७. एजे. १४५९ हा आयशर टेम्पो मागे घेत असताना सेंटरचे मालक श्रीधर उर्फ आप्पा मराळ यांच्या पायावरून टेम्पोचे चाक गेल्याची घटना आज सकाळी ८:३० वाजता घडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
टेम्पोचे चाक पायावरून गेल्याने सर्व्हिस सेंटर मालक गंभीर जख्मी
