दांडेली गावासाठी डॉक्टर उपलब्ध करून द्या….

सरपंच दादा पालयेकर यांची मागणी : ज्येष्ठ रुग्णांची होते गैरसोय_

*💫बांदा दि.०८-:* दांडेली गावात आरोग्यवर्धिनी केंद्र नाही. बुधवारी आठवडा बाजारादिवशी दांडेलीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदी विक्रीसाठी येतात. त्यामुळे ज्येष्ठ व इतर रुग्णांना तपासणीसाठी निदान बुधवारी एक डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, दांडेली सरपंच कृष्णा उर्फ दादा पालयेकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, आरोस गावात डॉक्टर तपासणीसाठी येतात. आरोस गाव हा दांडेली पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. तेथे ज्येष्ठ व इतर रुग्णांना ये जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही. दांडेली गावात बाजारपेठ असल्यामुळे लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यामुळे दांडेली गावात बुधवारी आठवडा बाजारादिवशी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच कृष्णा उर्फ दादा पालयेकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांच्याकडे केली आहे. नागरिकांची आरोग्यासंदर्भात होणारी परवड लक्षात घेऊन या मागणीसंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविल्याचे सरपंच दादा पालयेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page