बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्यापासून कोविड-१९ लसीकरण…

*💫बांदा दि.०७-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज पासून म्हणजे सोमवार 8 मार्चपासून गावनिहाय ६० वर्षावरील व्यक्तींना कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ सोमवार सकाळी १० वाजता सुरु करण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. हे लसीकरण ६० वर्षांवरील असलेल्या जेष्ठ व्यक्तींना प्रथम केले जाणार आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जर सबंधित २० रोगांचे त्रास असतील तर त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करण्यात येणार आहे. प्रा.आ.केंद्र बांदा येथे लसीकरणास येताना सोबत आधारकार्ड अथवा पॅनकार्ड अथवा निवडणूक ओळ्खपत्राचा पुरावा घेऊन येण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. पुढीलप्रमाणे गावनिहाय होणार लसीकरण होणार, ८ मार्च रोजी बांदा सटमटवाडी, बुधवार 10 रोजी बांदा देऊळवाडी, शुक्रवार 12 रोजी बांदा उभाबाजार व रामनगर, सोमवार 15 रोजी पोलीस लाईन व मोर्येवाडी, बुधवार 17 रोजी बांदा बाजारआळी व मुस्लिमवाडी, तर शुक्रवार 19 रोजी काळसेवाडीसाठी लसीकरण करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page