*💫बांदा दि.०७-:* बांदा नट वाचनालय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा यांच्या सयुक्त विद्यमानाने जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन खास महीला वर्गासाठी पाक कला स्पर्धा शनीवार दि. १३ मार्च राेजी सांयकाऴी ४ वा. बांदा नट वाचनालयात आयाेजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पालेभाज्या व इतर भाज्या पासुन तिखट काेणताही खाद्य पदार्थ असणे आवश्यक आहे. हा पदार्थ बनविताना ७० टक्के भाज्याचे प्रमाण असणे आवश्यक व ३० टक्के बाहेरच आवरण (स्टप) असणे आवश्यक. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्याना आकर्षक पारीताेषीक व उत्तेजनार्थ बक्षीसे श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्यावतीने दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेट वस्तु लाेकमान्य मल्टीर्पज साेसायटी शाखा बांदाच्यावतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महीला महीला वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या महीला अध्यषा दर्शना पांगम, केसरकर व नट वाचनालयाच्या संचालीका स्वप्निता सावंत यानी केले आहे. सहभागी हाेणाऱ्या महीला वर्गाने आपली नावे शुक्रवार दि. 12 मार्च पर्यत वाचनालयाच्या ग्रंथपाल प्रमिला माेरजकर/नाईक यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांदा नट वाचनालयात 13 रोजी पाककला स्पर्धा …..
