रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे जागीच निधन…!

सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. मडूरा येथील ग्रामस्थांनीयाबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. रेल्वेच्या धडकेत त्याचे जागीच निधन झाले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह आणण्यात आला….

Read More

मराठा समाजाला इतर मागासवर्ग कोट्याचे आरक्षण तात्काळ लागू करा…

मराठा सेवा संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता ७मराठा समाजाला इतर मागासवर्ग कोट्यातून आरक्षण देण्याबाबत झालेल्या शासन निर्णयाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी करावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे. अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याची भेट घेत निवेदन सादर केले…

Read More

ओरोस बुद्रुक शाळा शिक्षक बदली प्रकरणी ग्रामस्थांनी घेतली सीईओंची भेट…

सिंधुदुर्गनगरी ता ७ऐन परीक्षांच्या कालावधीत ओरोस बुद्रुक नंबर १ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करून त्यांच्या जागी नव्याने शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत ओरोस सरपंच उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी आज थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे लक्ष वेधले. तसेच या शाळेत शिक्षक देण्याची मागणी…

Read More

सिंधुदुर्ग वकील संघटनेचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध”…!

⚡सावंतवाडी दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केवळ वैयक्तिक हल्ला नसून भारताच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर झालेला गंभीर आघात असल्याचे सांगितले. या सभेस संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षण शिबिर…

मनीष दळवी:सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार असून, उमेदवारांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे हे यामागील उद्दिष्ट.. ⚡सिंधुदुर्ग दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत भरती प्रक्रियेसाठी नोंदणीकृत उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर पुढील आठवड्यापासून सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार असून, उमेदवारांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे हे यामागील उद्दिष्ट असल्याची माहिती…

Read More

प्लास्टिकचा वापर टाळत पर्यावरणपुरक शारदोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.०७-: एकिकडे दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वाढत असतानाच बाल गणेश मंडळातर्फे यावर्षी पर्यावरणपुरक शारदोत्सव साजरा करण्यात आला. प्लास्टिकच्या पत्रावळी आणि द्रोण यांना फाटा देत केळीच्या झाडांच्या पानांचा वापर करण्यात आला.वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील बाल गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शारदोत्सव साजरा करण्यात आला. हा शारदोत्सव साजरा करताना मंडळाने समाजासमोर एक…

Read More

ओटवणेत १९ रोजी दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०७-: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२/- रूपये (श्री. बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सावंतवाडी नगरपरिषदेला शववाहिका प्रदान…

सावंतवाडी : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक शववाहिका सावंतवाडी नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहर आणि परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. अंत्यविधीसाठी शववाहिकेची उपलब्धता होताना गैरसोय निर्माण होत होती. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एक शववाहीनी कॅथोलिक असोशीयनला देण्यात आली होती….

Read More

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई…

१ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त: दोन जण ताब्यात.. ⚡बांदा ता.०७-: राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली सिंधुदुर्ग येथील पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई केली. ही कारवाई सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपायुक्त डॉ. राजेश देशमुख आणि…

Read More

बाळकृष्णचे राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत आणखी एक यश…!

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडीचा राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने मडगाव, गोवा येथील केपे तालुक्यात झालेल्या आठवी चंद्रकांत नाईक मेमोरियल राष्ट्रीय फिडे रेटिंग रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत खुल्या गटात सोळावा क्रमांक पटकावला. गोव्यासोबत इतर राज्यातील तीनशे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाळकृष्णने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून…

Read More
You cannot copy content of this page