एस.टी.एस परिक्षेत तळवणे नं. ४ शाळेचे यश…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत तळवणे नं. ४ शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीतील टॉप ५० मध्ये स्थान मिळवत शाळेच्या लौकिकात भर घातली.
कु. श्रावणी शिवाजी कवडे हिने १४ वा क्रमांक मिळवला ,तर कु. गौरांग बाबू वैज याने ३९ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थी या परीक्षेत मेडलधारक ठरले आहेत, ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल पालक, ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रातून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विनोद झेंडे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page