⚡वेंगुर्ला ता.०९-: महाराष्ट्र शासन
कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण व वायंगणी ग्रामपंचायत
यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १० एप्रिल सकाळी ७.३० वा. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच
येथे कासव महोत्सव २०२६
चे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा. मान्यवरांचे आगमन व स्वागत, सकाळी ८ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात येणार आहे. ८.३० वा. मान्यवरांच्या हस्ते वाळुशिल्पाचे फित कापुन उद्घाटन, ९.३० वा. कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा सन्मान, ९.४५ वा. कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, १०.०० वा. मान्यवरांचे मार्गदर्शन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून खा. नारायण राणे, आ. निरंजन डावखरे, आ. दिपक केसरकर, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. निलेश राणे, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत आदी तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई चे डॉ. रविकिरण गोवेकर, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर,
उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई श्रीम. मधुमिता एस.,मुख्य वनसंरक्षक कोल्हापुर (प्रा.)श्रीम. श्रीलक्ष्मी ए.,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रविंद्र खेबुडकर, वनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी चे मिलीश शर्मा,
विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग दक्षिण कोकण, अलिबाग च्या कांचन पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवन) मालवण चे
महादेव शिंगाडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन
वेंगुर्ला वनपरिमंडळ अधिकारी (कांदळवन)
सुनिल सावंत व वायंगणी ग्रामपंचायत सरपंच अवी दुतोंडकर यांनी केले आहे.
वेंगुर्ला वायंगणी बीचयेथे उद्या 10 एप्रिल रोजी कासव महोत्सवाचे आयोजन…
