माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर…

विविध शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी:नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन..

⚡कणकवली ता.०९-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बी. के. एल. वालाबालकर रुग्णालय, डेरवण यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवारी १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत नेहरू नगर येथील भगवती हॉल, ता. कणकवली येथे पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात विविध आजारांवरील मोफत तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मोफत शस्त्रक्रियांमध्ये अँजिओप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान – नाक – घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी व मोतीबिंदू आदींचा समावेश आहे. तसेच अल्पदरात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये हर्निया शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशयासंबंधित आजार, थायरॉईड शस्त्रक्रिया, मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अँपेंडिक्स, मूळव्याध, स्तनांमधील गाठी, हायड्रोसिल व इम्प्लांट रिमूव्हल यांचा समावेश आहे. याशिवाय, जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ञ व नेत्ररोग तज्ञ यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page