नांदगावात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

*💫कणकवली दि.२०-:* -कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाचीवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच नदीचे पाणी या विठ्ठल मंदिराभोवती मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र काल सायंकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे येथील पाणी कमी झाले आहे. विठ्ठल रखुमाईची सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष…

Read More

ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुगीचे दिवस…

अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद;खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला यश *💫कुडाळ दि.२०-:* ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला लवकरच सुगीचे दिवस दिवस येणार असून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीचा विचार करता अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांना ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला अखेर यश…

Read More

कोरोना व्हायरसमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना भरीव आर्थिक मदत करावी

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची मागणी *💫मालवण दि.२०-:* कोरोना व्हायरसमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना असलेली शासनाच्या भरीव आर्थिक मदतीची व पॉलिसीची गरज ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनात मोंडकर यांनी म्हटले की, गेल्या दीड वर्षात कोरोना…

Read More

जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 948 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 366.3650 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.89 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 22.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे…

Read More

कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2317.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 40(2185),…

Read More

वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाची विशेष सभा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न  

पुढील काळातील निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याचा घेण्यात आला एकमुखी ठराव *💫वेंगुर्ला दि.१९-:* पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्तापासून कामाला लागावे, असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्‍या विशेष सभेत घेण्‍यात आला. स्‍वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे, सिंधुदुर्ग जिल्‍हा काँग्रेसचे अध्‍यक्ष बाळा गावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका…

Read More

मालवणचे माजी सभापती उदय परब याना मातृशोक

*💫मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रीमती अर्चना प्रभाकर परब (८२ वर्ष) यांचे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले रात्री उशिरा कांदळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कांदळगावच्या रहिवाशी असणाऱ्या श्रीमती अर्चना परब या सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीमुळे जनमानसात लोकप्रिय होत्या. उमेदीच्या काळात त्यांनी स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित लघुउद्योग सुरू करून महिलांसमोर एक…

Read More

झाराप-पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे स्विफ्ट कारला अपघात…

माजगाव येथील एक किरकोळ जखमी तर एकाचा हात फ्रॅक्चर *💫सावंतवाडी दि.१९-:* झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कारला झालेल्या भीषण अपघातात माजगावातील दोघा युवकांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात माजगाव येथील एका युवकाला किरकोळ दुखापत तर एकाचा युवकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यावेळी घटनास्थळी…

Read More

सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने आधार दयावा

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी *💫मालवण दि.१९-:* कोविड महामारीच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाचा आधार मिळावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देवून पर्यटन विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात २४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More
You cannot copy content of this page