*💫कणकवली दि.२०-:* -कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाचीवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच नदीचे पाणी या विठ्ठल मंदिराभोवती मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र काल सायंकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे येथील पाणी कमी झाले आहे. विठ्ठल रखुमाईची सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष भाविकांना आपल्या आराध्य दैवताचं- विठ्ठल रखुमाईचं दर्शन पंढरपुरात जाऊन ‘याची देही याची डोळा’ घेता आलं नाही. त्यामुळे तो आनंद भाविक कोरोनाचे सारे नियम पाळत मंदिरात येऊन उपभोगत आहेत. नांदगाव वाघाची वाडी येथील मंदिरातही भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत.
नांदगावात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा
