Headlines

कणकवली पंचायत समितीत खासदार विनोद तावडे व आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर…

⚡कणकवली ता.०५-:
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेले विनोद तावडे आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झालेले प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत आणि प्रदीप गावडे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी बोलताना बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी सांगितले की, विनोद तावडे आणि प्रमोद जठार हे दोन्ही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, या दोन्ही नेत्यांच्या निवडीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. पंचायत समितीच्या या मासिक बैठकीत मांडण्यात आलेल्या या ठरावाला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले. सिंधुदुर्गच्या या दोन सुपुत्रांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल यावेळी सदस्यांनी आनंद व्यक्त केला.

You cannot copy content of this page