वेंगुर्ला शहरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलची समस्या…

उभादांडा व मठ येथे पेट्रोल – डिझेल उपलब्ध असल्याने नागरिकांतून समाधान..

⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला तालुक्यात सोमवार 4 एप्रिल रोजी पेट्रोल पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी प्राप्त पेट्रोलसाठा संपल्याने वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलसाठा संपल्याने नागरिकांची धावपळ होत आहे. दरम्यान मठ
मठ येथे पेट्रोल – डिझेल उपलब्ध असल्याने वाहनधारकांची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.तसेच
उभादांडा श्री देव मानसीश्वर पेट्रोलपम्प येथेही मंगळवारी पूर्ण दिवस पेट्रोल पुरवठा पूर्ण दिवस सुरु असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ठराविक दिवसानंतर पुन्हा पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याने वाहनधारकांची तारांबळ होत असून शासनाच्या धोरणाविरोधात वाहधारकातून असंतोष व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित कंपनीने मुबलक प्रमाणात पेट्रोलसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page