मालवणचे माजी सभापती उदय परब याना मातृशोक

*💫मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रीमती अर्चना प्रभाकर परब (८२ वर्ष) यांचे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले रात्री उशिरा कांदळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कांदळगावच्या रहिवाशी असणाऱ्या श्रीमती अर्चना परब या सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीमुळे जनमानसात लोकप्रिय होत्या. उमेदीच्या काळात त्यांनी स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित लघुउद्योग सुरू करून महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला होता गेली काही वर्षे त्या आजारी होत्या मालवण तालुक्याचे माजी सभापती उदय परब यांच्या आई, कांदळगाव सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या सासू, तर भारतीय कामगार सेना, महासंघ चिटणीस जी. एस. परब यांच्या वहिनी तसेच दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भंडारी हायस्कूलचे शिक्षक कै. मधुकर तुकाराम परब आणि मालवण मध्ये मोडीलिपी लिहिणारे कै. वि. तु. परब यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, दिर, जावई, जावा,भाचा, भाची, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page