पुढील काळातील निवडणूका स्वबळावर लढविण्याचा घेण्यात आला एकमुखी ठराव
*💫वेंगुर्ला दि.१९-:* पुढील काळातील सर्व प्रकारच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्तापासून कामाला लागावे, असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्या विशेष सभेत घेण्यात आला. स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका कॉग्रेसची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, प्रदेश प्रतिनिधी दादा परब, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते ईर्शाद शेख,ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष जगनाथ डोंगरे, पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते प्रकाश डिचोलकर, महिला शहराध्यक्षा नगरसेविका कृतिका कुबल, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग नाटेकर, आरवली विभागीय अध्यक्ष मयुर आरोलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, विजय खाडे, नगरसेवक दादा सोकटे, उत्तम चव्हाण, रमेश नाईक, समीर नागवेकर, अंकुश मलबारी, पांडूरंग लोणे, प्रशांत परब, सखाराम परब, कृष्णा आचरेकर उपस्थित होते. सभेत तालुका व शहरनिहाय असलेल्या बुथ कमिट्या कार्यरत करणे, प्रत्येक जिल्हा परिषद. विभागात बैठकांचे आयोजन करणे तसेच विविध सेलचे पदाधिकारी नेमून कमिट्या तयार करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांमधून, पुढील होऊ घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कॉंग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात असा आग्रह धरला. त्यानुसार तसा ठरावही घेण्यात आला. यावेळी जिल्हापरिषद मतदार संघनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी ‘एकंदरीत राजकिय वातावरणाचा विचार करता जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षा बरोबर राहाणार असल्याचे चित्र जाणवत असून आपण सर्वांनी त्यांच्या पर्यंत पोहोचून त्याला चालना दिली पाहिजे, असे सांगितले. महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी ‘महिलांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून देतानाच महिला आरक्षणातूनही महिलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.” असे मत व्यक्त केले. तालुकाध्यक्षा विधाता सावंत यांनी येणाऱ्या नगरपरिषद व जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी तुळस, मातोंड विभागीय अध्यक्षपदी रावजी दुलाजी परब यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक व आभार दादा सोकटे यांनी केले.
