कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2317.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 40(2185), सावंतवाडी – 60(2440.10), वेंगुर्ला – 46(2002), कुडाळ – 50(2909), मालवण – 44(2752), कणकवली – 87(2461), देवगड – 87(2171), वैभववाडी – 42(2323), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page