जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 948 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 366.3650 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.89 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 22.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 62.2110, अरुणा – 58.4084, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2012, ओटाव – 2.4008, देंदोनवाडी – 0.9720, तरंदळे – 2.2190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.2350, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 1.6930, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8850, शिरगाव – 1.1290, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

You cannot copy content of this page