सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने आधार दयावा

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

*💫मालवण दि.१९-:* कोविड महामारीच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाचा आधार मिळावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देवून पर्यटन विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे, त्याबद्दल महासंघातर्फे आभार मानण्यात आले आहेत. सिंधुदुर्गातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटन व्यवसाय हा कोरोना महामारीने सर्वात जास्त अडचणीत आलेला असा व्यवसाय आहे. या पार्श्वभुमीवर भारतातील एकमेव अधिकृत घोषित पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील २५- ३० वर्षात इथल्या भुमिपुत्रांनी स्वकष्टाने उभारलेल्या पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासना मार्फत ठोस उपाययोजना करणे कधी नव्हे एवढे गरजेचे झाले आहे. त्या दिशेने गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांशी व त्यांच्या विविध प्रतिनिधींशी संपर्क करून व्यापारी महासंघातर्फे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी तांतडीने आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. टाळेबंदीच्या काळात प्रत्यक्ष वापरलेल्या विजेचेच पैसे प्रति युनिट दरा प्रमाणे आकारुन या काळातील विज देयकात महावितरण कडून आकारण्यात आलेल्या इतर आकार,स्थिर आकार आदी अन्य सर्व रक्कमेचा भार शासनाने सोसावा. सर्व प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांच्या बॅंका,वित्तीय संस्था, पतसंस्थां कडून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्या बरोबरच ‘३१डिसेंबर २०१९ ही पायाभूत तारीख धरून’ नियमीत कर्जदारांच्या माहे एप्रिल ते सप्टेंबर २०२० व माहे एप्रिल ते सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या कर्जावरील संपुर्ण व्याज माफ करावे. अशा पुनर्गठना सोबतच ‘केंद्र सरकारने जाहिर केल्या प्रमाणे’ पर्यटन व्यावसायीकांना येत्या दिवाळी मोसमा पुर्वीच त्यांच्या मुळ कर्जाच्या २०% रकमे पर्यंत अतिरीक्त पतपुरवठा करण्याच्या अधिकृत सुचना महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्या मार्फत राज्य व जिल्हा सहकारी बॅंका व पतसंस्थाना तांतडीने निर्गमित कराव्यात. नागरीकांना पर्यटनास प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून ‘इंग्लंडच्या सरकारने हाॅटेल, रेस्टाॅरंट खर्चावर लागू केलेल्या अनुदान योजने प्रमाणेच’ थेट ‘पर्यटन प्रोत्साहन’ अनुदान योजना ‘निवास,भोजन व जलक्रिडा अश्या’ सर्व प्रकारच्या पर्यटन खर्चावर तात्काळ सुरू करावी. चिपी विमानतळासह कोकण रेल्वे मार्गावरील सर्व प्रवासी गाड्या पुर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. कोकण रेल्वे मार्गावर ‘मालवाहतूकीसाठी सुरू असलेल्या रो-रो सेवेच्याच धर्तीवर’ प्रवासी रो-रो सेवा सुरू करावी. सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्व जिल्हातंर्गत मार्गांची तांतडीने दुरूस्ती करावी. इंटरनेट सेवा व विज पुरवठा विना व्यत्यय सुरळीत रहाण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने अन्य राज्यात प्रमाणेच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी व्यापक आणि परीणामकारक अशी जाहिरात मोहिम प्रभावी पणे प्रसारीत करावी. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येत्या २७ सप्टेंबर रोजी पर्यटन महामंडळ,जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या सर्व संघटना व संस्था यांच्या समन्वयाने आभासी मंचावर एकदिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित करावा आणि या महोत्सवात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री नाम.आदित्य ठाकरे यांनी आभासी माध्यमांद्वारे येथील पर्यटन व्यावसायीकांशी थेट संवाद साधावा. सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाच्या उभारीसाठी तांतडीने करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजना राबविणेही गरजेचे आहे. पर्यटनाशी थेट संबंधीत असलेल्या सर्व नोंदणीकृत व्यावसायीकांना सन २०२०-२१ व सन २०२१-२२ अशी सलग किमान दोन वर्षे वसेकर(जिएसटी)अंतर्गत आवश्यक सर्व प्रकारचे परतावे(रिटर्न्स) भरण्यास एक तर माफी द्यावी किंवा अशा सर्व पर्यटन व्यावसायीकांचा वसेकरांतर्गत नोंदणीकृत दर्जा दोन आर्थिक वर्षांसाठी स्थगित ठेवावा. जिल्ह्यातील पर्यटनाशी निगडीत सर्व व्यवसायांची अधिकृत सांख्यिकी (डाटा) गोळा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. पर्यटन विभाग, पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन व्यावसायीकांचे प्रतिनिधींची मिळून जिल्हास्तरीय पर्यटन विकास संयोजन समिती कायमस्वरूपी वैधानिकरीत्या निर्माण करावी. सर्व प्रकारच्या पर्यटन व्यवसायांसाठी आदर्श नियमावली, दर्जा व मोसम आधारीत कमाल व किमान दर निश्चिती लागू करावी. जलक्रिडा व साहसी जलक्रिडांचे परवाने अधिकृत एक खिडकी पद्धतीने एका निश्चित खात्या मार्फत देण्याची व्यवस्

You cannot copy content of this page