⚡मालवण ता.०५-:
सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या वतीने रविवारी दैवज्ञ भवन मालवण येथे मौजीबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील १० बटुंचे मौजीबंधन करण्यात आले.
यावेळी डाॅ.विवेक रायकर, श्री. उमेश नेरुरकर, श्री.राजेश पनवेलकर, श्री.मोहन तळगांवकर प्रा.सुभाष गोवेकर, श्री.दयानंद मोंडकर, श्री.मंगलदास साळगावकर श्री.अरविंद सराफ यांच्यासह जिल्ह्यातील समाज बंधु, भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण च्या बंधु- भगीनींनी विषेश परिश्रम घेतले.
