केंद्र सरकारकडून लस पुरवठा होत असताना काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न
राजेंद्र म्हापसेकर यांची आ नाईकांचे नाव न घेता टीका *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: केंद्राकडून प्राप्त होणारी लस राज्यांना दिली जाते व राज्यांकडून जिल्ह्यांना वितरित करण्यात येते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लस वाटपात होणाऱ्या अन्यायाबाबत वेळोवेळी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु राज्य शासनाकडून आवश्यक ती दखल न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव…
