कस्तुरी तुळसकर – अवंतिका देसाई संयुक्त द्वितीय, नित्या सावंत तृतीय..
⚡वेंगुर्ला ता.०८-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत (दहावी) वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 19 विद्यालयामधील 672 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 662 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 98.51 टक्के इतका लागला आहे. हा निकाल आज शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थीनी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची कन्या नुपूर विलास गावडे हिने 98 टक्के गुण मिळवित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावीला आहे. मदर तेरेसा स्कुलची विद्यार्थीनी कस्तुरी दिनेश तुळसकर 97.80 टक्के आणि परूळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थीनी अवंतिका अमेय देसाई 97.80 टक्के गुण मिळवित तालुक्यात संयुक्त द्वितीय, श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेच्या नित्या विजय सावंत हिने 97.40 टक्के गुण मिळवित तालुक्यात तृतीय, तसेच शिरोडा गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या आरूषी मोहन जाधव हिने 96.80 टक्के गुण मिळवित तालुक्यात चतुर्थ तर शिरोडा विद्यालयाच्या निधी निवृत्ती सारंग हिने 96.60 टक्के गुण मिळवित तालुक्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे
श्री माऊली विद्यामंदिर रेडी : प्रथम साईशा अनंत कांबळी 92.80 टक्के. न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा
प्रथम वैभवी सुदेश चीपकर 89 टक्के. कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली
प्रथम अर्पिता प्रशांत धर्णे 94.40 टक्के. श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे :
प्रथम नित्या विजय सावंत 97.40 टक्के.श्री शिवाजी हायस्कुल तुळस :
प्रथम प्रतिक भिकाजी परब
87.40 टक्के. न्यू इंग्लिश स्कुल मातोड :
प्रथम दीक्षिता रोहन मातोंडकर 93.40 टक्के. रा . कृ .पाटकर हायस्कूल वेंगुर्ला : प्रथम दुर्वा महेश गावकर 93.20 टक्के.मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी :
प्रथम कांचन गणपत शेटकर 91.20 टक्के.आसोली हायस्कूल :
प्रथम श्रेया प्रदीप गावडे 91 टक्के.अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे :
प्रथम अवंतिका अमेय देसाई ९७.८० टक्के.सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला :
प्रथम सिद्धी भरत गावडे ९५.२० टक्के. रायसाहेब डॉ. रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ : प्रथम वसंत ठाकूर 85.08 टक्के. श्री सरस्वती विद्यालय, आरवली-टांक : प्रथम ऋतुज हृदयनाथ गोडकर 90 टक्के.अणसूर-पाल हायस्कूल : प्रथम श्रीयश दिलीप मालवणकर 91 टक्के.स.का.पाटील विद्यामंदिर केळुस :
प्रथम धीरज सुरेश शेटये 96 टक्के. मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ला प्रथम नुपूर विलास गावडे 98 टक्के. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला : प्रथम गिरीजा सुनिलकुमार चव्हाण 94.80 टक्के. गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडा : प्रथम आरूषी मोहन जाधव 96.80 टक्के.
न्यू इंग्लिश स्कुल दाभोली :
प्रथम समिधा वसंत पवार 88.80 टक्के. असे यश मिळविले आहे.
