सावंतवाडी : तालुक्यात यंदा दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत ९८.५९ टक्के निकालाची नोंद झाली आहे. तालुक्यातील एकूण १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये १ हजार
६८४ विद्यार्थी उर्तीर्ण झाले असून यात ९०० मुले व ७८४ मुलींचा समावेश आहे. यात मिलाग्रिसची विद्यार्थीनी भार्गवी अंकुश शेटवे हिने १०० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर जिल्ह्यातही अव्वल स्थान राखले आहे. तसेच मिलाग्रिसचेच विद्यार्थी कृष्णा महेश पास्ते ९९.४० टक्के गुणांसह द्वितीय तर विराज नंदकिशोर राऊळ ९९ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच आरपीडीच्या योगेश जोशी याने ९८.८० टक्के तर कळसुलकर हायस्कूलच्या मृणाली देसाई हिने ९७.८० टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले.
विशेष म्हणजे तालुक्यातील ४६ प्रशालांपैकी तब्बल ३० विद्यालयांनी शंभर टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. १०० टक्के गुण मिळवून तालुक्यासह जिल्ह्यातही उज्वल यश संपादन केलेल्या भार्गवी शेटवे हिने आपल्या यशाचे श्रेय प्रशालेतील शिक्षक, आई-वडील व भावाला दिले. तिचे वडील माजी सैनिक असून तिनेही नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. यात प्रशालेतून योगेश जोशी ९८.८० टक्के गुण मिळवित प्रथम तर द्वितीय दिनेश राऊळ ९७.४० टक्के तर अद्विता तेरेदेसाई ९५.८० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात भार्गवी अंकुश शेटवे हिने १०० टक्के गुण मिळवून प्रथम, कृष्णा महेश पास्ते ९९.४० टक्के गुणांसह द्वितीय तर विराज नंदकिशोर राऊळ याने ९९ टक्के गुण मिळवित प्रशालेसह तालुक्यातही तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला. यात मृणाली मधुकर देसाई ९७.८० टक्के प्रथम, टक्के तर द्वितीय तेजस सावंत ९७.२० टक्के तर आर्या फाले हिने ९६.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सावंतवाडीतील शांतीनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक निहाल प्रवीण राऊळ ९५.४० टक्के, द्वितीय क्रमांक दीपराज संतोष गावडे ९४.८० टक्के तर तृतीय क्रमांक श्रावणी चंद्रहास सावंत ९४ टक्के चतुर्थ क्रमांक अनन्या संजय सावंत ९३.२० टक्के हीने प्राप्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. कु. कृतिका किरण पालव हिने ९४.८० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. गुंजन पांडुरंग गावडे ९१.६० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. यशवंत अशोक पेडणेकर व कु. पुर्वा प्रसाद गावडे यांनी ९१.४० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. यात फिदा जहीर अब्बास शेख ९१. ४० टक्के प्रथम, मोहम्मद साहील इब्बाल नाईक ८७.६० टक्के द्वितीय तर मिसबा जमि रुद्दीन शहा हिने ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडीचा निकाल ९० टक्के लागला. यात जान्हवी जाधव ७६.८० टक्के प्रथम, द्वितीय तनीश गावडे ६७ टक्के द्वितीय तर रितेश डावाळे ६६.६० टक्के गुण मिळवून तृतीय प्राप्त केला.
सावंतवाडी सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडीचा निकाल ९३.७५ टक्के लागला. यात आयेशा सावकार ८५.८० टक्के गुणांसह प्रथम, अबुझर धामनेकर व खादीजा अली अकबर बक्कर ७८.८० टक्के द्वितीय टक्के तर तृतीय इस्रात मालदार याने ७३.८० टक्के गुण प्राप्त केले.
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात वेदांत सावंत ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम, नियती सोलकर ९०.६० टक्के द्वितीय तर मयुरेश मेस्त्री ८६.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे या हायस्कूल चा दहावी शालांत परीक्षेचा निकाल ९५.८३ टक्के येवढा लागला. यामध्ये मानसी नाईक ८६.२० टक्के गुणांसह प्रशालेतून प्रथम क्रमांक मिळविला तर गिरीश वर्णेकर ८५ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक तर सदिच्छा गांवकर व सुरभी गांवकर यांनी ८४ टक्के गुण मिळवत संयुक्त पणे तृतीय क्रमांक मिळविला.
श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा दहावीचा निकाल ९५.३८ टक्के लागला. यात कौस्तुभ दळवी ९५.४० टक्के गुणांसह प्रथम, रामचंद्र परब ९१.६० टक्के द्वितीय तर श्रेयस परब याने ८९.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
आरोंदा हायस्कूल आरोंदा प्रशालेच्या एस एस सी निकाल ९६.१५ टक्के एवढा लागला आहे. प्रथम सार्थक राऊत ९४.६० टक्के, गौरी मेस्त्री ९० टक्के द्वितीय तर तृतीय सायली पोळजी ८३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय, कुणकेरीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रणय परब ८७.६० टक्के गुणांसह प्रथम, सोहम गावडे ८३.४० टक्के द्वितीय तर सूर्यकांत जोशी याने ८१.८० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक प्राप्त केला.
माध्यमिक विद्यालय माडखोलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अनुष्का तेली ९२.२० टक्के प्रथम, द्वितीय नम्रता सावंत ८८.४० टक्के तर श्रद्धा संतोष परब ७८.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. यात निधी हरमलकर ८२.६० टक्के प्रथम, व्दितीय रिया गांवकर ८०.२० टक्के द्वितीय तर सानिका दळवी ७६.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
आंबोली पब्लिक स्कूल आंबोलीचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला यात शिवात्मिका च्युलियन ९६ टक्के प्रथम, किंजल खोत ९० टक्के द्वितीय तर अनुदय नलगे ८९ टक्के याने तृतीय क्रमांक पटकावला.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा दहावी परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यशवंत विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट वेदांत महाडिक ९४.२० व कॅडेट पार्थ सांडव प्रत्येकी ९४.२० टक्के गुणांसह प्रथम, कॅडेट जगन्मय कांबळी ९४ टक्के द्वितीय तर कॅडेट सतेज पाटील याने ९२.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
आंबोली विद्यानिकेतन प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात बाळकृष्ण कोरगावकर ८४.२० टक्के गुणांसह प्रथम, ऋतूजा घोलेकर ७२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर भार्गव धुरी ६३.८० टक्के गुण मिळवून तृतीय ठरली.
युनियन इंग्लिश स्कूल आंबोलीचा निकाल ९५ टक्के लागला. यात सिद्धी गवस ८१ टक्के प्रथम, तनुजा घोगळे ७९.८० टक्के द्वितीय तर साक्षी ठोंबरे हिने ७८.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
चौकूळ इंग्लिश स्कूल, चौकूळ या शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली. प्रशालेत प्रथम क्रमांक कु. जान्हवी केशव गावडे ७८.८० टक्के, द्वितीय क्रमांक कु. अनुष्का अनंत कानसे ७६.८० टक्के , तृतीय क्रमांक कु. मृणाली लक्ष्मण परब ७३.८० टक्के हीने प्राप्त केला आहे.
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस विद्यालयाचा एकत्रित निकाल १०० टक्के लागला. प्रथम प्रसाद कृष्णा मडुरकर ९०.२० टक्के, द्वितीय क्रमांक विष्णु नाईक८६.६० टक्के तर तृतीय क्रमांक फ्रीडा मेंडीस ८०.४० टक्के हिने मिळविला.
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम भार्गवी आळवे ९६.६० टक्के, द्वितीय हर्ष वारंग ९१.६० टक्के तर तृतीय मिताली खोत हिने ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीय प्राप्त केला.
पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशींगे प्रशालेचा एस एस सी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यात श्रेयस शिर्के ८६.८० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय सुशांत राऊळ ७२.८० टक्के तर ओजस निकम ७१.८० टक्के याने तृतीय क्रमांक पटकावला.
श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये या विद्यालयाचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के येवढा लागला. यात पूर्वा सावंत ८९.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर किशोरी गावकर ८४.८० टक्के गुणांसह व्दितीय तर अभिषेक कोळापटे ८१.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२.८५ टक्के लागला. प्रथम अभिनव जाधव ६९.८० टक्के, द्वितीय अभिजित सावंत ६९.४० टक्के तर लावण्या राऊळ हिने ६३ टक्के गुण मिळवून तृतीय प्राप्त केला.
कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित, कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला. यात प्रथम क्रमांक माधुरी महेश राऊळ ९१.८० टक्के, व्दितीय क्रमांक सानवी निळकंठ गुरव ९१.६० टक्के तर तृतीय क्रमांक सानिका ज्ञानदेव राऊळ ८२.२० टक्के यांनी प्राप्त केला.
माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा निकाल ९५.१२ टक्के लागला आहे. यात आर्या गोसावी ९१.२० टक्के प्रथम, शमिका धर्णे ९०.८० टक्के द्वितीय तर कुणाल मेस्त्री याने ८३.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
मळगाव हायस्कूल मळगावचा दहावीचा निकाल ९७.०५ टक्के लागला आहे. यात किशोर ज्योतीबा फडके ९१.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय नारायण विद्याधर मांजरेकर ९१.४० टक्के तर तृतीय बापू दीपक जोशी ८७.८० टक्के ठरला.
विद्या विहार कनिष्ठ विद्यालय आरोसचा दहावीचा निकाल ८९.४७ टक्के लागला. यात अक्षता झोरे ८८.६० टक्के गुणांसह प्रथम, अश्मी पिंगुळकर ८५ टक्के द्वितीय तर नैतिक घोगळे याने ७६.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोलीचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेची विद्यार्थीनी हर्षदा पाटील हिने ८८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. श्रावणी सावंत ८७ टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय तर सृष्टी नाईक हिने ८६ टक्के गुण मिळवन विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे प्रशालेचा एकूण निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम निशाद प्रभू ८९.४० टक्के प्रथम, सिद्धी राऊत ८८.४० टक्के द्वितीय तर ओम नाईक याने
८७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विलवडे ग्रामोन्नती मंडळ संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडे या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून, यात गोविंद दळवी ८८.४० टक्के प्रथम क्रमांक, तर सलोनी गवस ८८ टक्के गुणांसह द्वितीय तर जान्हवी नाईक हिने ८४.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
दिव्य ज्योती इंग्लिश स्कूल, बांदा प्रशालेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ९६.७७ टक्के निकालाची नोंद केली आहे. यामध्ये स्वरा सातार्डेकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम समृद्धी परब हिने ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ख़ुशी शेख ९२.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
माध्यमिक विद्यालय डेगवेचा निकाल १०० टक्के लागला. यात विजय कोन्डोस्कोप ९३.२० प्रथम, चैताली वरक ८५.८० द्वितीय तर बाळकृष्ण शिंदे हा ८५.४० टक्के गुण मिळवून तृतीय ठरला.
इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालय प्रशालेचा दहावीचा निकाल ९७.८७ टक्के लागला. यात गौरांगी राणे ९२.४० टक्के प्रथम, नूजत शेख ९० टक्के द्वितीय तर सुस्मिता सावंत ८९.२० टक्के गुणांसह तृतीय ठरली.
