पालकामंत्र्याची तारीख पे तारीख

कळणे वासीयांना न्याय देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आहेत कुठे ?;नुकसानग्रस्त अभय देसाई या युवकाचा सवाल

*⚡दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-:* कळणे येथील खाण फुटून कित्येक दिवस उलटले पण देशोधडीला लागलेल्या शेतकरी बांधवांचे संसार रस्त्यावर आले आहेत तरी कळणे खाण संदर्भात किंवा झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात सत्ताधारी सरकार कडून प्रश्न मार्गी लागलेला नाही पालकमंत्री १९ ऑगस्ट पासून तारीख वर तारीख देत आहेत. त्यामुळे कळणे गावातील ग्रामस्थ शेतकरी यांना न्याय देणारे सत्ताधारी तसेच प्रशासनाचे अधिकारी कुठे राहिले असा सवाल कळणे खाण फुटून संपूर्ण शेती बागायती गमावलेल्या शेतकरी कुटुंबातील युवक अभय पांडुरंग देसाई याने केला आहे. जुलै महिन्यात २९ रोजी कळणे खाणीत ओव्हरफ्लो झालेले पाणी बाहेर सोडण्यासाठी मानव निर्मित कळणे खाणींचा बांध जेसीबी मशीन लावून फोडू पाण्याचा लोंढा गावातील डबीवाडी धवडकीवाडी येथील शेती बागायती लोकवस्ती मध्ये सोडला आणि मोठा हाहाकार उडाला काही क्षणात कोट्यावधी रुपये नुकसान झाले पण आज महिना होत आला तरी सत्ताधारी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन अधिकारी, या लोकांना न्याय किंवा भरपाई देवू शकला नाही त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page