*⚡कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा सर्व्हीस रोड वर एस. टी. व कार यांच्यात अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही .सदर अपघात सायंकाळी ४.३० च्या सुमारास नांदगाव येथे घडला या अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत असले तरी नांदगाव येथील सर्व्हीस रोड प्रश्न न सुटल्याने सदर अपघात घडत आहेत. एकाच सर्व्हीस रोड ने दोन्ही वाहतूक सुरू असून दोन वाहने सुटण्यासाठी वाहन चालक यांना कसरत करावी लागत आहे. सर्विस रोड नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारी एस.टी .नांदगाव तिठाहुन सर्व्हीस रोडने जात असताना गोव्याहून कोल्हापूर दिशेने जाणारी कार ओव्हर ब्रिज वरील वाहतूक बंद असल्याने व एक साईट सर्व्हीस रोड नसल्याने विरुद्ध दिशेने वाहने जाण्यावाचून पर्याय नाही यामुळे येथे दोन वाहनांचा अपघात झाला सुदैवाने कोणी ही जखमी झाले नसून कार चे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर सर्व्हीस रोड नसल्याने किती अपघाताची वाट यंत्रणा बघणार आहे असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.
नांदगाव तिठा सर्व्हीस रोडवर एस. टी. व कार यांच्यात अपघात
