कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथे संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमाराला गोव्याला जाणारा कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मात्र दोन्ही महिला केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्या. दोन्ही जखमींना कुडाळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्र एमएच ०४-एनबी -९९९५) महामार्गावरील सिंधुरत्न हॉस्पिटल समोर बजाज शोरूम येथे आला असता पावसामुळे निसरड्या बनलेल्या ठिकाणी घसरून समोरून जाणाऱ्या दुचाकीला (क्र एमएच ०७- एके -७०१७) ला धडकला. कंटेनरची चालक केबिन विरुद्ध बाजूला येऊन दुभाजकावर आदळली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली.
कुडाळ येथे कंटेनर-दुचाकी अपघात : दोन महिला जखमी…
