शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करा…

दीपक केसरकरांचे आवाहन:जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची कृषी विभागाला कानउघडणी..

⚡सावंतवाडी ता.०८-: शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करा, कोकणातील शेतकऱ्यांचा उद्धार करण आपलं धैय्य आहे. आज शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असून त्यामुळे येणाऱ्या अस्मानी संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन करा असे आवाहन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथे खरीप हंगाम पूर्व सभेत ते बोलत होते.

येथील श्रीराम वाचन मंदिरात कृषी विभागाकडून खरीप हंगाम पूर्व सभेच आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच गतवर्षातील अहवाल सादर करण्यात आला. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेतून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण योजना दिल्या आहेत. श्री पद्धतीने लागवड होऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी उद्दीष्ट्याच्या पुढे जाऊन प्रयत्न करावेत. ‘फूड सिक्युरिटी आर्मी’ योजनेतून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी लाभ देत आहोत. कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो त्यामुळे राज्यात दुष्काळ आला तर त्यांना ओला चारा पुरवण्याची जबाबदारी आपली आहे. उन्हाळी शेतीच प्रमाण आपणाला वाढवण आवश्यक आहे. दुबार पीकांचही नियोजन होण आवश्यक आहे. बीयाण आगावू मागवून त्याचे नियोजन तसेच पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. यासाठी अनेक योजना आम्ही सुरू केल्या असून त्या यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच यांत्रिकीकरणाचीही मदत घेण आवश्यक आहे. आतापासून तयारी केली तर जून महिन्यात लागवड करणं सोप होईल. तसेच फळ पीकाकडेही लक्ष द्यावे, वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून कृषी विभागाची कान उघडणी !
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी कानउघडणी केली. सभेत कृषी अधिकारी बोलत असताना अन्य कर्मचारी मोबाईलवर असतील, गप्पा गोष्टीत असतील तर सभा कोणासाठी होती ? असा सवाल त्यांनी केला. तर आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा. शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतीचा विकास व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करा, शासनाने दिलेल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी माजी मंत्री आम. दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, दोडामार्ग पं.स. उपसभापती गणेश प्रसाद गवस, जि.प. सदस्य सुधा कवठणकर, यज्ञा साळगावकर, विजय नाईक, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी जी.एस. गोरे, कृषी अधिकारी वेंगुर्ला मंगेश चव्हाण, कृषी अधिकारी दोडामार्ग एस. डी. कदम, पं.स. सदस्य महेश धुरी, जितेंद्र गांवकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, शरद धाऊसकर आदींसह कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page