*⚡कणकवली ता.२७-:* नारायण राणे साहेब ,तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. भारतीय जनता पार्टीचा विजय असो” हमसे जो टकरायेगा,वो मिट्टी मे मिल जायेगा..!” अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खारेपाटण येथे केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांचे फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नारायण राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर जन आशीर्वाद यात्रेचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथे स्वागत झाले.यावेळी माजी मंत्री आशिष शेलार,आमदार नितेश राणे, माजी खा.निलेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, यात्रा प्रमुख प्रमोद जठार, जि.प. अध्यक्ष संजना सावंत, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जि.प .अध्यक्ष गोट्या सावंत,भाजपा तालुकाध्यक्ष सतोष कानडे ,सभापती मनोज रावराणे, जि. प.सदस्य बाळा जठार, संजय देसाई यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खारेपाटणमध्ये जल्लोषी स्वागत
