Headlines

पावसाळी हंगामासाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज…

मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. कुडाळ : शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.शुक्रवारी कुडाळ येथील…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथे स्ट्रीटलाईट्स समस्या ; शासनाचे दुर्लक्ष…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात मागील आठवड्यात शुक्रवारी 8 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी आडेली खुटवळवाडी एरियातील स्ट्रीटलाईट्स तारावर फ़ांद्या तुटून पडल्याने स्ट्रीटलाईट्स विजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत संबंधित विभागास ग्रामस्थांनी माहिती देऊनही अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विजवितरण तालुक्यात चांगले काम करीत असतानाही आडेली खुटवळवाडी येथील स्ट्रीटलाईट्स पुरवठा नियमित सुरु…

Read Full News

भटवाडी तारांगण पार्कमधीलरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन …

नगराध्यक्षांची उपस्थिती : नाल्यावर काँक्रिटीकरणाची शुभारंभ.. सावंतवाडी, ता. १५ : येथील पालिकेने शहरात विविध विकासकामांचा सपाटा लावला आहे. आज भटवाडी तारांगण पार्कमधील रस्ता कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले. तर मधुसूदन कशाळीकर निवासस्थान परिसरातील नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी नगरसेवक बाबू कुडतडकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच ३० कोटींपार…

३४.३४ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी.. ⚡ओरोस ता १५-: जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला बळकटी देणारी घटना शुक्रवारी घडली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे जिल्हा परिषदेचे बजेट गेले आहे. दुपारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तब्बल १९ कोटी ५२ लाख १९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित वाढ असलेल्या अंदाजपत्रकासह ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपयांचे…

Read Full News

दोडामार्गात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡दोडामार्ग ता.१५-:दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून दोडामार्ग तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी चिन्मयी जयराज खानोलकर हिने ९६.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, मेढी येथील…

Read Full News

देवगड ग्रामीण रुग्णालयास सभापती, उपसभापतींची सरप्राइज व्हिजिट…

डायलेसिस विभागातील त्रुटींवर संताप; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तात्काळ फोन.. ⚡देवगड ता.१५-:येणाऱ्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम व सतर्क राहावी यासाठी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयास सरप्राइज भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी…

Read Full News

कास गावात नऊ शेतपाणंद रस्ते खुले…

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक.. ⚡बांदा ता.१५-: राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते खुले करा” या अभियानाअंतर्गत कास गावात बंद अवस्थेत असलेले शेतपाणंद रस्ते पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कास गावाला भेट देत सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे कौतुक केले.सरपंच प्रवीण पंडित, ग्रामपंचायत…

Read Full News

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी…

ओरोस ता १५रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा 2026मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी दमदार कामगिरी करत चार जलतरणपटूनी पहिल्या दहा नंबरात येण्याचा मान पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते व काही प्रमाणात इतर राज्यातूनही स्पर्धक आले होते ज्यामध्ये गोवा मध्य प्रदेश गुजरात ओडिसा येथील स्पर्धक होते त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी सहभाग…

Read Full News

सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून गौरव…

प्रमोद कामत यांच्याकडून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता १५-:दहावी बारावी शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा कायम राज्यात आघाडीवर राहिला आहे याचे श्रेय जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आहे त्यांची मेहनत कष्ट यामध्ये मोठे आहे त्यांनी यापुढेही असेच यशस्वी होऊन वरिष्ठ अधिकारी बनण्याचे स्वप्न पहावे त्यासाठी कष्ट मेहनत आणि अभ्यासातील चिकाटी कायम ठेवून जिल्ह्याचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा जिल्हा…

Read Full News

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास कमी पडत होते हेच या आकडेवारीवरून दिसून येते. दाखल्यांचा आकडा ज्यावेळी शून्यावर येईल तेव्हाच आपण गतिमान प्रशासन म्हणू अशा कडक…

Read Full News

You cannot copy content of this page